*Cyber Awareness*
*©️# Amod Wagh*
Maharashtra Cyber Cell
अशोक, निवृत्ती कडे झुकलेले, मोठ्या आयटी कंपनीतील वरिष्ठ अधिकारी, कंपनीत खूप मान असणारे व समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व. त्यांचा मोठा मुलगा चार वर्षा पासुन परदेशात व धाकटी मुलगी (लग्न न झालेली) कॉलेज च्या शेवटच्या वर्षाला होती.
यांच्या कडून एक विचित्र तक्रार सायबर विभागा कडे आली होती, ते मागील काही दिवसांपासून एका मोठ्या शॉपिंग मॉल कडून प्रेग्नंन्सी च्या वस्तु व सेवा संदर्भातील सातत्याने येणार्या जाहिरातीं मुळे चक्रावून गेले होते. FB वर यू ट्यूब वर सातत्याने या प्रकारच्या जाहिराती दिसत होत्या. याबाबत त्यांनी संबधीत मॉल कडे तक्रार ही केली होती.
सायबर डिपार्टमेंटने सखोल चौकशी केल्या नंतर जी माहिती समोर आली ती चक्रावून टाकणारी होती, त्यांच्या मुलीने काही दिवसांपूर्वी त्या शॉपिंग मॉल मधून प्रेग्नन्सी च्या काळात वापरल्या जाणार्या वस्तूंची खरेदी कार्ड वापरून केली होती, *त्यावेळी प्रेग्नंन्सी च्या वस्तु असणार्या सेक्शन मधे ती 13 मिनिटे रेंगाळत असलेली CCTV फुटेज मध्ये दिसत होती.*
*जी गोष्ट मुलीच्या पालकांना माहीत नव्हती ती गोष्ट मॉल मधील सॉफ्टवेअर ला माहीत होती.*
या मुलीच्या बँक अकाऊंट ला पालक म्हणून वडिलांचे नाव व फोन नंबर दिला होता तसेच मोबाईल कंपनी कडून सिमकार्ड घेताना अल्टरनेट नंबर वडिलांचा दिला होता, तसेच मॉल मधील लॉयल कस्टमर प्रोग्रॅम अंतर्गत भरून दिलेल्या फॉर्म मध्ये फॅमिलीची माहिती दिली होती.
*CCTV फुटेज मध्ये दिसणार्या हालचाली व बिलाचे पेमेंट करतानाची माहिती वापरून आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारा डेटा अॅनालीसीस करून संबंधित व्यक्तिला जाहिराती दाखवल्या जात होत्या.*
******************************
किशोर एक नव उद्योजक, स्टार्टअप प्रोग्रॅम अंतर्गत स्वतःचा व्यवसाय नुकताच वर्षा पुर्वी सुरु केलेला, क्रेडिट कार्ड पेमेंट, लाइट बिल, फोन बिल, कार्पोरेशन टॅक्स... इत्यादी काटेकोर पणे वेळेपूर्वीच भरणारा, फायनान्शियल ट्रॅक रेकॉर्ड अतिशय स्वच्छ असणारा.
बिझनेस लोन साठी शासकीय MSME योजने अंतर्गत सरकारी बॅंकेत केलेला अर्ज रिजेक्ट झाल्या मुळे वैतागलेला, शेवटी पर्याय म्हणुन स्वतःचे खाते असलेल्या कोऑपरेटिव्ह बॅंकेत लोन साठी अर्ज केला तर काही दिवसांनी तोही रिजेक्ट.
बर्याच ओळखीने, खटपटी करून व खूप विनंत्या केल्या नंतर बँकेच्या अधिकाऱ्याने खासगी मध्ये लोन रिजेक्ट होण्या मागचे जे कारण सांगितले ते सुन्न करणारे होते.
*बँकेच्या लोन सॅक्शंन करणार्या टीमने किशोरची सोशल मीडिया प्रोफाइल चेक केली असता त्यांना अनेक ठिकाणी अतिशय उग्र शब्दात व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया, एका विशिष्ट विचारसरणीचे समर्थन करणार्या पोस्ट, राजकारण/राजकिय व्यक्ति संबधित मते व त्यांच्या सोबतचे फोटो या गोष्टी आढळल्या.*
त्यामुळे *किशोरच्या अर्जावर लोन रिकव्हरी साठी धोकादायक व्यक्ति असा रिमार्क मारला होता व किशोर च्या सोशल मीडिया प्रोफाइल चा निगेटिव्ह असा उल्लेख केला होता.*
त्यामुळे लोन मिळवण्यासाठी आवश्यक त्या इतर सर्व पात्रता असून सुद्धा लोन मिळू शकले नाही.
**************************
*डिजिटल आयडेंटिटी*
*लक्षात घ्या की आजच्या इंटरनेट च्या युगात प्रायव्हसी नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही Privacy is a big Myth. एका सायबर सर्वे नुसार दिवसातून एक तास सोशल मीडिया/स्मार्ट फोन वापरणारी व्यक्ति वर्षभरात 55,000 डिजिटल फुट प्रिंट सोडत असते.*
आपली सोशल मीडिया प्रोफाईल ही आपली महत्वाची डिजिटल फुट प्रिंट आहे. सोशल मीडिया वर आपण टाकत असलेल्या पोस्ट, व्हीडिओ, व्यक्त केलेली मते, प्रतिक्रिया हे सगळे आपली डिजिटल फुट प्रिंटच आहेत, आपण मोबाईल/कॉम्प्युटर मधील हिस्ट्री डीलीट करतो व त्या द्वारे आपल्या पाऊलखुणा पुसायचा प्रयत्न करतो. त्या आपल्या हॅन्डसेट मधून गेल्या तरी वेगवेगळ्या सर्व्हर वर त्यांची नोंद शिल्लक असते, आपल्या मोबाईल/कॉम्प्युटर /इंटरनेट वायफाय चा IP अॅड्रेस असतो त्याचीही नोंद असते, आपला मोबाईल सतत जवळच्या मोबाईल टॉवरशी जोडलेला असतो त्यामुळे तुम्ही किती वाजता उठला, किती वाजता घरा बाहेर पडला, ऑफिस ला जायचा नेहमीचा रस्ता कोणता, ऑफिस ला यायला कितीवेळ लागतो, तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर काय खाता, तुम्हाला कपडे कोणते आवडतात, पिकनिकला जायचे ठिकाण, किती वेळा विमान प्रवास करता, तुम्हाला काय आजार आहेत, मेडिकल चे बिल किती येते, तुम्ही मध्यमवर्गीय आहात की श्रीमंत, तुम्ही FB वर जास्त वेळ घालवता की WhatsApp वर, यू ट्यूब आवडते की OTT, तुम्ही काय लाईक 👍🏻करता, काय डिस लाईक 👎करता कोणते ईमोजी जास्त वापरता.....इत्यादी शेकडो प्रकारची माहिती ही तुमच्या पेक्षा जास्त तुमच्या स्मार्ट फोन ला पर्यायाने गूगल/अॅपल वा सोशल मीडिया सॉफ्टवेअर ला माहीत आहे. *या तुम्ही सोडलेल्या डिजिटल फुट प्रिंट मधून तुमची डिजिटल आयडेंटिटी तयार होत असते.*
सोशल मीडिया वर व्यक्त केलेले मत ही तुमची त्यावेळची प्रतिक्रिया असते ती नकारात्मक, उग्र, भडकाऊ, किंवा सकारात्मक कशीही असू शकते आणी अश्या हजारो प्रतिक्रिया तुम्ही दिलेल्या असतात, काल ज्यागोष्टी बद्दल नकारात्मक होतात त्या गोष्टी बद्दल आज तुम्ही न्यूट्रल किंवा सकारात्मक असू शकता. *मात्र भूतकाळातील तुमच्या प्रतिक्रिया किंवा मते आज तुम्हाला अडचणीत आणू शकतात. थोडक्यात तुमची डिजिटल फुट प्रिंट तुमचा पाठलाग करत राहते.*
*डिजिटल फुट प्रिंट चांगली ठेवण्यासाठी उपाय/Solutions -*
1) गरजेपेक्षा जास्त वैयक्तिक माहिती कधीही देऊ नये.
2) डॉक्टर किंवा अत्यंत जवळच्या व्यक्ती शिवाय सोशल मीडिया वर तुमच्या, तुमच्या कुटुंबाच्या आरोग्या विषयक माहिती सांगू नका.
3) आपली मते, भावना, प्रतिक्रीया व्यक्त करणे खरोखरच आवश्यक आहे का हे ठरवा, अगदीच आवश्यक असल्यास अत्यंत संतुलित, सौम्य शब्दात व्यक्त करा.
*4) सोशल मीडियावर शेअर करायच्या गोष्टींवर मर्यादा घाला. कधीही म्हणजे कधीही सोशल मीडिया वरील क्वीझ, गेम, फन प्ले... ई मध्ये सहभागी होऊ नये.*
5) कोणत्याही वेबसाईट/अॅप वर लॉगइन विथ फेस बुक, गूगल अकाऊंट हा पर्याय कधीही वापरु नका तो अत्यंत धोकादायक आहे.
6) जूने वापरात नसलेले ईमेल आयडी, सोशल मीडिया/ फेसबुक /डबल डबल प्रोफाईल अकाऊंट डिलीट करा.
7) अनोळखी, पब्लिक वायफाय वापरु नका, वापरल्यास वैयक्तिक, आर्थिक माहिती देऊ नका.
8) अकाऊंट हॅक झाल्यास त्वरित तज्ञ व्यक्तीची मदत घ्या.
शेवटी सायबर सीक्युरीटी चा मुलभूत नियम कधीही विसरू नका - *"सावधानी हटी तो दुर्घटना घटी..."*
*Be Vigilant, Be Cyber Smart & Stay Safe...*
*©️# Amod Wagh*
Maharashtra Cyber Cell
No comments:
Post a Comment